उल्हासनगरच्या अतिरिक्त आयुक्त वादाच्या भोव-यात

लाचमागितल्याचा व्हिडीओव्हायरल


उल्हासनगर (प्रतिनीधी): उल्हासनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विजया कंठे यांनी कथितरित्या लाच मागितलल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ माली आहे. उल्हासगर कॅम्प ५ येथे राजू झनकर यांची मिळकत असून त्या मिळकतीला रस्ता नसल्याने ते महापालिकेकडे तीन ते चार वर्षांपासून रस्ता मिळावा म्हणून पाठपुरावा करत आहेत. येथे रस्ता मिळवून देण्यासाठी महापलिकेच्या अतिरिक्त आयक्त विजया कंठे यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप राज झनकर यांनी केला असुन तसा व्हिडीओही त्यांनी व्हायरल केला आहे. याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयातही दाद मागितली आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कंठे यांनी महापलिकेच्या पथकासह घरी येऊन माझे, पत्नी व परिवाराचे फोटो काढल्याचे झनकर यांनी सांगितले. यासंदर्भात झनकर यांनी पोलिस आयुक्त ठाणे, पोलिस उपायुक्त उल्हासनगर यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.