नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाडीवरुन वाद

कल्याण (प्रतिनीधी): कल्याणमध्ये नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाडीवरुन महिला वाहतूक पोलिस आणि एका महिलेमध्ये शुक्रवारी सायंकाळी चांगलाच वाद झाला.  पोलिस अधिका-याने मारहण करत कपडे फाडल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अर्धा तास सुरु असलेल्या या भांडणाचा बघ्यांनी मात्र मनमुराद आनंद घेतला. तीसगाव मंदिरात महिला पुजारीला मारहाण झाल्याची घटना ताजीच असताना शुक्रवारच्या या घटनेने संताप व्यक्त हात आह. कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय मॉलबाहेर शुक्रवारी सायंकाळी रुबिना शेख या महिलेने आपली दुचाही पार्क करत ती मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेली होती. या दरम्यान वाहतूक पोलिसांनी तिची दुचाकी नो पार्किंग मध्ये उभी असल्याने उचलून टोईंग व्हॅनमध्ये ठेवली. यावेळी रुबीना शेख या मॉल बाहेर आल्याने त्यांनी आपण दंड भरण्यास तयार असून ही दुचाकी खाली उतरवावी, अशी विनंती वाहतूक पोलिसांना केली. यादरम्यान, रुबिना आणि महिला माताराना पोलिस अधिकारी वंदना कवडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. रुबिना यांनी महिला पोलिस अधिकारी वंदना कवडे यांनी आपल्याला मारहाण करत आपले  कपडे फाडल्याचा आरोप केला । कला आहे. तर, या आरोपांचे कवडे यांनी खंडन करत रुबिना यांनी आपल्याला धक्काबुक्की केली व ती टोइंग व्हॅनमध्ये जाऊन बसली असे सांगितले. सुमारे अर्धा तास हा वाद  सुरु होता. अखेर या दोघींनी महात्मा पुले पोलस ठाण्यात हा वाद  मिटवल्याचे बोलले जात आहे.