शेवटच्या बैठकीत झाले तरी काय? ठाणे. उल्हासनगरसाठी सेनेचा घोषणाचा पाऊस !

मंबई (प्रतिनीधी) : मंबई पालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता आल्यावर नागरिकांना मालमत्ता करातून सुट देण्याची महत्वपूर्ण घोषणा तीन दिवसांपूर्वीच करण्यात आली. या घोषणेचे मुंबईकरांनी उत्सफर्त स्वागत केले. विशेषत: महिला वर्गाकडून आंनदी प्रतिक्रीया व्यक्त झाल्या. मंबईकर जसे सेनेच्या पाठीशी असतात तसेच ठाण्यातील जनता सध्दा सरुवातीपासन शिवसेनेसोबत आहे. शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्यावर विशेष प्रेम होते. ठाण्यात पुन्हा शिवसेनेची सत्ता आल्यास ठाणेकर जनतेला विविध सवलती व सुविध देण्यात येतील. असे उदध्व ठाकरे यांनी मातोश्री येथे अयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे. महापौर संजय मोरे. खासदार अनिल देसाई, राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते. मुंबई प्रमाणेच ठाण्यातही ५०० चौरस फुटापर्यंतच्या पाय घेतला आणि भाजप नेत्यांच्या तिळपापड झाला. आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून बैठकीत काय घडले, हे कथन केले. इतके होऊनही आमचे वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील असे दोन्ही बाजूने सांगण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळपर्यंत युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांशी संपर्क साधला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपच्या नेत्यांना वर्षा वर बोलावून घेतले त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मात्र युती तोडवीच, असा निर्णय झाल्याचे समजते. दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री बंगल्यावर पत्रकारांशी बोलताना युतीबद्दलची संदिग्धता कायम ठेवली. अजून भाजपचा प्रस्ताव आपल्यार्यंत आलाच नसल्याचे सांगतानाच तो आल्यावर त्यावर बोलता येईल, त्यामुळे आम्ही जो असेल तो निर्णय घेऊ, असे सांगून उध्दव यांनी आपले मनोगतच उघड केले आहे. मुख्यमंत्री आणि उध्दव यांच्यात आता बोलणी होण्याची शक्यता अंधूक झाल्याने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती होणार नाही, हे नक्की झाले आहे. महत्वाचे म्हणजे ठाण्यातही शिवसेना हाच पवित्रा घेण्याचे संकेत असून ठाणे आणि उल्हासनगर या महापालिकांसाठी सेनेचा वचननामा ठाकरे यांनी जाहीर केला. त्यामुळे आता युती केवळ राज्य सरकारच्या सत्तेपुरती राहणार आहे.


युतीच्या बोलणीसाठी गेल्या आठवड्यात झालेल्या तिन्ही बैठका निष्फळ ठरल्या. परवा तर निम्म्या जागा मागणा-या भाजपला अवघ्या ६० जागा देऊ करुन शिवसेनेने आपली ताठर भूमिका स्पष्ट केली. भाजपने दादर, विलेपार्ले, घाटकोपर या शिवसेनेच्या बालेकिल्यांवरच दावा सांगितले होता. अखेर युतीची अखेरची बैठकदेखील निष्फळ झाल्याने आता आमचे श्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील. असे जाहीर करुन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठक संपवली. शनिवारी रात्री आशिष शेलार, रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली यापूढे युतीसाठी पुढाकार घ्यायचा नाही असाच निर्णय या नेत्यांनी घेतला असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवरच, भाजपकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याचे रविवारी उध्दव ठाकरे म्हणाले. संक्रांतीनंतर सुरु झालेल्या बैठकांचा सिलसिला अखेर कड़ तोंडानेच संपला होता. कलांकित नेत्यांना बोलणी करायला कशासाठी पाठवले ? हा शिवसेनेचा सवाल भाजपवाल्यांना चांगलाच झोंबला होता. त्यामुळे आम्ही कलांकित आहोत आमच्याशी हातमिळवणी का करता ? असे उपरोधिकपणे एका नेत्याने सेना नेत्याला विचारले, तेव्हा तेवढ्याच कुजकटपणे कोळशाच्या धंद्यात आमचे हात काळे झाले तर हरकत नाही, असा प्रतिटोला त्याने लगावला होता.